श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण
अलिबाग,जि. रायगड दि.17 (जिमाका):- श्रीवर्धन शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सामान्य दर्जाचे क्ष-किरण मशीन होते. जुन्या तंत्रज्ञामुळे सध्याच्या मशीन मध्ये ठराविक एक्स-रे च निघत असल्याने तसेच त्याचा दर्जा सामान्य असल्यामुळे रुग्णाला उत्तम दर्जाच्या एक्स-रे साठी खासगी एक्स-रे क्लिनिक मध्ये जावे लागत होते. परिणामी रुग्णाला आर्थिक भूर्दंड सोसावा लागत होता. पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात येथे डिजिटल क्ष-किरण यंत्राचे आज वितरण करण्यात आले व एक्स-रे सेवेचे उद्घाटनही करण्यात आले.
उद्घाटनानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रुग्णालयाची
पाहणी करून सोयी-सुविधांचा आढावा घेतला व संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी
नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक,पं.स.सदस्य मंगेश कोबनाक, प्रांताधिकारी
श्री. अमित शेडगे, तहसिलदार शरद गोसावी, रुग्णालयाचे
वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर ढवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.जी.भरणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडे, डॉ.गवळी, दर्शन विचारे, सौ.मीना वेशवीकर मान्यवर तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील कर्मचारी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment