क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती; जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




अलिबाग,(जिमाका)दि.7- क्रांतिवीर  राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी  यांनी राजे  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील  अन्य शाखांचे प्रमुख,अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस फुले वाहुन अभिवादन केले.
राजे उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड कुटुंबामध्ये 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील ते आद्यक्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श होते. भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. 1857 च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर म्हणजे उमाजी नाईक.

000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत