संवादपर्वः श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणे पथनाट्यातून शासकीय योजनांचा जागर


अलिबाग दि.5,(जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत गणेशोत्सवात संवादपर्व कार्यक्रमात  श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणे, रोहा येथे  'वाटचाल रायगडची' या पथनाट्यातून शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
शासकीय उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन  श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणे, ता.रोहा येथे करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली.
           यावेळी श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणेचे अध्यक्ष अरविंद जावरे,  उपाध्यक्ष संतोष जैन, उपाध्यक्ष सचिन मोदी, सचिव अमित मोदी, खजिनदार नरेश जैन, सहसचिव संतोष इप्ते, सहखजिनदार सचिन जैन, सल्लागार मंगेश तेरडे,  मंडळाचे सदस्य, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबागचे  प्रतिम सुतार, प्रणिता गोंधळी, स्वप्नाली थळे,  सुचित जावरे आदि उपस्थित होते.
           यावेळी प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांनी वाटचाल रायगडची पथनाट्यातून किल्ले रायगड विकास, कामांचे स्वरुप, जलयुक्त शिवार, शेततळे, 4 कोटी वृक्ष लागवड, क्रीडा संकुल, पायाभूत सुविधा, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनांची आणि त्याद्वारे जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील विठ्ठल बेंदुगडे, जयंत ठाकूर, सचिन राऊत यांनी परिश्रम घेतले.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत