रॅडिसन रिसॉट येथे रक्तदान शिबीर


            अलिबाग दि.9(जिमाका)- जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथील शासकीय रक्तपेढीमार्फत रॅडिसन रिसॉट येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 47 व्यक्तींनी रक्तदान केले.
            यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, रॅडिसन रिसॉट चे जनरल मॅनेजर विशाल जामवार, एच.आर.मॅनेजर इशरत सिद्दीकी, एल ॲण्ड डी मॅनेजर ज्ञानेश्वर राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने आदि उपस्थित होते.
            जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी यावेळी रक्तदानाचे महत्व व एचआयव्ही/एड्स विषयी व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांनी माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन ही केले.
            या रक्तदान शिबीराकरीता शासकीय रक्तपेढीतील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.दिपक गोसावी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रमोद जगताप, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार, जिल्हा सहाय्यक लेखा रविंद्र कदम, महेश घाडगे यांनी सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता विशेष परिश्रम घेतले.
एडस सर्वेक्षणासंदर्भात कार्यशाळा
नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टीट्युट पुणे यांच्या मार्फत जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे मातेकडून बालकास होणारा एचआयव्ही संसर्ग या विषयी घेण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाकरीता डॉ.मेघा माऊलकर व डॉ.वैशाली वर्धन, नारी पुणे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे संजय माने यांनीही मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणाकरीता रायगड जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या आयसीटीसी केंद्रातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयटीसी 01, आयटीसी 02, उपजिल्हा रुग्णालय रोहा, कर्जत, ग्रामीण रुग्णालय उरण, पोलादपूर, नगरपालिका दवाखाना खोपोली येथील समुदेशक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खालापूर, रेवदंडा, वावोशी येथील एएनएम उपस्थित होत्या.


000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज