आय.आय.एच.टी.बरगढ, वेंकटगिरी येथे प्रथम व द्वितीय वर्षाकरिता प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

 

 

अलिबाग,दि.12 (जिमाका):- केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन-2023-24 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीसा) करीता 13 जागा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 1 जागा तसेच वेंकटगिरी करिता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दि.23 जून 2023 पर्यंत मागविण्यात येत आहेत.

 त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दि.23 जून 2023 पर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावेत.  प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http://www.directortextilesmah.in/main.php, वर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे, असे आयुक्त वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर एम.जे.प्रदीप चंदन यांनी कळविले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक