आदिम जमातींची दिल्ली येथे अभ्यास कार्यशाळा


  अलिबाग,दि.12(जिमाका) :- जनजाती कार्य मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रधानमंत्री पीव्हीटीजी डेव्हलपमेंट मिशन अंतर्गत आदिम जमाती कॉन्फरन्स कम एक्सपोजर व्हिजिट नवी दिल्ली येथे दि.10 जून ते दि.14 जून 2023 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

  संपूर्ण भारतात एकूण 75 आदिम जमाती आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये कातकरी,कोलाम व माडिया गोंड या तीन आदिम जमाती वास्तव्यास आहेत. रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने कातकरी आदिम जमात मोठ्या प्रमाणात आहे..

या कार्यशाळेकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण मार्फत रायगड जिल्ह्यातील दोन कातकरी बांधवांना कार्यशाळेत जाण्याची संधी मिळाली आहे. या देशस्तरीय कार्यशाळेमध्ये महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुरमु यांच्याशी भेटण्याची व त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे संधी मिळणार आहे तसेच राष्ट्रपती भवन व संसद भवन येथेही भेट देणार आहेत.

या कार्यशाळेकरिता कातकरी बांधवांना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण श्रीमती शशिकला अहिरराव  यांनी शुभेच्छा देऊन ही टीम दिल्लीकडे रवाना झाली.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान