शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

 

अलिबाग,दि.15 (जिमाका):- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत रायगड जिल्ह्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील होतकरु व बेरोजगार व्यक्तींना व्यवसाय, स्वयंरोजगार करण्याकरिता अल्प व्याजदराने विविध योजनेंतर्गत कर्ज देण्यात येते. तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते.

तरी या योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या गरजू व्यक्तींनी, विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या श्री राम समर्थ गृहनिर्माण सह.सो.पहिला मजला, रुम नं.101, मारुती मंदिराच्यामागे, चेंढरे, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक – 02141-224448,ईमेल - dmobcalibagraigad@gmail.com या पत्यावर अथवा महामंडळाच्या वेबसाईट www.msobcfdc.org

संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.

योजनेचा उद्देश- इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रु.20 लक्ष पर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल.

योजनेचे स्वरूप- राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु.10 लक्ष पर्यंत, परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु.20 लक्ष पर्यंत.

कार्यपद्धती- ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत.

लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती :- अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे, अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता रू.8 लक्ष पर्यंत असावी, अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा.

कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे :- अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला, तहसिलदारांचा उत्पन्नाचा व महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला,  अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड, ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो, अर्जदारांचा जन्माचा/वयाचा पुरावा,  शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र, शिष्यवृत्ती (Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा, आधार संलग्न बँक खाते पुरावा. तसेच इतर आवश्यक कागदपत्रे/ पुरावे.

शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम

राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम- आरोग्य विज्ञान-MBBS, BDS, BAMS, BHMS, B.Pharm. व संबधित विषयांतील सर्व पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिकी - B.E. B. Tech. B. Arch (सर्व शाखा). तसेच संबंधित विषयांतील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम इ. व्यावसायिक अभ्यासक्रम- एल.एल.बी., हॉटेल मॅनेजमेंट फॅशन टेक्नॉलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, एमबीए, एमसीए, शिपिंग विषयातील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम, इ. कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान- Animal & Fishery Sciencer, B.Tech, BVSC, B.Sc इ. संबंधित विषयातील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.

देशांतर्गत अभ्यासक्रम- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NACC ) अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. परदेशी अभ्यासक्रम- आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी- शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. तसेच व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.

तरी योजनांबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या श्री राम समर्थ गृहनिर्माण सह.सो.पहिला मजला, रुम नं.101, मारुती मंदिराच्यामागे, चेंढरे, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक – 02141-224448,ईमेल - dmobcalibagraigad@gmail.com या पत्यावर अथवा महामंडळाच्या वेबसाईट www.msobcfdc.org

संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री.निशिकांत नार्वेकर यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक