मुलूंड येथे गुरुवारी रोजगार मेळावा


अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.14- कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान बृहन्मुंबई, महानगरपालिका मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.19 रोजी सकाळी आठ ते सायं.  पाच यावेळात औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) नवीन इमारत मिठागर रोड, मुलंड (पूर्व) मुंबई येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात अल्पशिक्षित दहावी, बारावी पास,नापास व पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले आणि आयटीआय मधून प्लंबर, इलेक्ट्रीशियन, एअर कंडिशनिंग, रेफ्रीजरेशन रिपेअरींग याच ट्रेडचे प्रशिक्षण घेतलेल्या अठरा ते पस्तीस वर्षे वयोगटातील कुशल, अकुशल तसेच दिव्यांग युवक-युवतींकरिता  हॉटेल, रेस्टॉरंन्ट, पर्यटन, हाऊस किंपिग, फॅसिलिटी मॅनेजमेंट, क्रूझ लाईन या आस्थापनांवरील रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. इच्छूक उमेदवारांनी  मुलाखतीस येताना स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) नवीन इमारत मिठागर रोड, मुलंड (पूर्व) मुंबई  या मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत