अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाची सतर्कता



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.11-  जिल्ह्यात गेले तीन दिवस अतिवृष्टी होत असून येते काही दिवसही अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
            जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील, सखल भागातील तसेच दरडग्रस्त गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभुमिवर संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये  तलाठी, मंडळ अधिकारी , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी पाहणी करावी. डोंगरावरील मनुष्यवस्तीच्या भागातील गावांमध्ये जमिनीला भेगा पडणे, जमिनीखालून माती मिश्रीत पाणी येणे, घरांच्या भिंती खचणे,  पोल, झाड वाकडे होणे, डोंगरमाथ्यावर पाणी साचून राहणे, मोठे दगड हलणे या परिस्थितीची तात्काळ पाहणी करावी.
आवश्यकतेनुसार दरडग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे. तसेच आपापल्या परिसरातील धोकादायक, जुन्या पुलांची पाहणी करुन आवश्यकतेनुसार पुलांवरील वाहतुक सुरु किंवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा. वाहतुक बंद करावयाची असल्यास पर्यायी रस्त्यांची पाहणी करुन वाहतुकीची व्यवस्था करावी. धोकादायक पुलांचे कठडे वाहुन ग्ले असल्यास, पुल खचला असल्यास  तेथे दिशादर्शक फलक, झंडे लावण्यात यावे. सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात मुख्यालय सोडून जाऊ नये, नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावे.
रस्त्यावर माती येणे, पूल खचणे, घरांमध्ये पाणी शिरणे, झाड पडणे यासारख्या घटनांना तात्काळ प्रतिसाद द्यावा. पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणि आवश्यक उपाययोजना कराव्या. घडलेल्या घटनांची माहिती तात्काळ  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात (02141-222118/222097) येथे द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय यंत्रणेस दिले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यातील उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व अन्य यंत्रणेने दरडग्रस्त गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व तेथील रहिवांशाशी संवाद साधून सुरक्षा उपायाबाबत चर्चा केली.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत