जुलै-ऑगस्ट मध्ये होणाऱ्या 10 वी, 12 वी परीक्षा 17 पासून




अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.13- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ वाशी नवी मुंबई यांनी माहे जुलै व ऑगस्ट 2018 मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेबाबतचे नियोजन केले आहे.  त्यानुसार इयत्ता दहावीची परीक्षा दि.17 जुलै ते 2 ऑगस्ट 2018 दरम्यान होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा दि.17 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 दरम्यान होणार आहे.  जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी उरण, पनवेल,कर्जत,खोपोली,पेण,रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव, अलिबाग अशी दहा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.  तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी पनवेल, खोपोली,पेण, अलिबाग, महाड असे पाच केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.  यापरीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 3023 तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 2872 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी.एल.थोरात यांनी कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज