महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या  जयंतीनिमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन व भावपूर्ण आदरांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस  जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.  यावेळी तहसिलदार के.डी.नाडेकर, नायब तहसिलदार श्री.वैशंपायन,देवेंद्र पाटील तसेच कर्मचारी वर्ग आदि उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान