कर्ण बधीर बालकांना मोफत डिजीटल श्रवण यंत्र नविन पनवेल येथे शनिवारी शिबिर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4:- रायगड जिल्ह्यातील वय वर्ष 1 ते 18 वयोगटातील कर्णबधीर बालकांना मोफत डिजीटल श्रवणयंत्र देण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क् विकास मंच आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरीका यांच्या संयुक्त् विद्यमाने व रायगड जिल्हा परिषदेच्या सहकार्याने शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत रोटरी कर्णबधीर मुलांची शाळा नवीन पनवेल प्लॉट नं.18,सेक्टर-19, अग्निशामक दलामागे नविन पनवेल येथे कर्णबधीर बालकांसाठी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी रायगड जिल्ह्यातील कर्णबधीर  बालकांच्या पालकांनी तसेच कर्णबधीर विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी सदर शिबीरास कर्णबधीर बालकांना शनिवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी वरील ठिकाणी वेळेवर उपस्थित ठेवावे.असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद रायगड यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान