पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावरील वाहतुक शनिवारी (दि.6) बंद



अलिबाग जि.रायगड, दि.5 (जिमाका)- पोलादपूर तालुक्यात पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाटात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, जि.रत्नागिरी यांची बस कोसळून झालेल्या अपघातप्रकरणी  सद्यस्थितीत दरीत असलेली अपघातग्रस्त बस वर काढण्यासाठी शनिवार दि.6 रोजी सकाळी 8 ते दुपारी तीन या कालावधीत पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलादपूर पोलीस ठाणै फेटल मोटर अपघात रजि.नं.52/2018 हा अपघात पोलादपूर महाबळेश्वर रोडवर  मौजे दाभोळ गावचे हद्दीत घडला असून 28 जुलै 2018 रोजी दाखल करण्यात आला आहे. या अपघातामध्ये डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, जि.रत्नागिरी यांची बस आंबेनळी घाटातील दरीमध्ये सुमारे 700 ते 800 फूटखाली कोसळून अपघात झाला होता. या अपघातामध्ये एकूण 30 प्रवासी मयत झाले आहेत.  बस खोल दरीमध्ये असून सदर अपघाताचे निश्चित कारण समजण्याकरिता अपघातग्रस्त बसची प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत तपासणी होणे आवश्यक आहे.  त्याअनुषंगाने 6 ऑक्टोबर रोजी दरीमधून वर काढण्याचे असल्याने शनिवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 8वाजल्यापासून ते दुपारी 3वाजेपर्यंत पोलादपूर ते महाबळेश्वर या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी जारी केले आहेत.
00000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज