जवाहर नवोदय विद्यालय निजामपूरच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 1- जवाहर नवोदय विद्यालय वायनाड केरळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेमध्ये  जवाहर नवोदय विद्यालय निजामपूर विद्यालयातील कु.शार्दुला प्रशांत राघमवा, (सतरा वर्षाखालील गट). कु.आयुष मल्हार कुलकर्णी व कु.श्रावणी वाठारे (चौदा वर्षा खालील गट) हे विद्यार्थी सहभागी झाले होते. संपूर्ण भारतातून बुध्दीबळ स्पर्धेसाठी 240 विद्यार्थी सहभागी झाले होते.  या स्पर्धेमध्ये कु.शार्दुला प्रशांत राघमवार हिने 7 पैकी 5.5 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला असून तिची राष्ट्रीय स्तरावरील एस.जी.एफ.आय. स्पर्धेसाठी निवड  झाली आहे.  ही स्पर्धा डिसेंबर महिन्यामध्ये गंगटोक-सिक्कीम येथे होणार आहे.  या विद्यार्थ्यांचे प्राचार्य पी.के.नारायणन तसेच उप प्राचार्य इंदिरा नायर तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्त्तर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान