कळंबोली येथे बुधवारी रोजगार मेळावा



अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.6- कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व सक्षम स्कील ॲकेडमी खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि केएलई संस्थेचे सायन्स व कॉमर्स कॉलेज यांच्या सहकार्याने  बुधवार दि.10 रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळात केएलई संस्थेचे सायन्य व कॉमर्स कॉलेज सेक्टर क्र.1 कळंबोली ता.पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. सदर कंपन्याना दहावी पास-नापास, बारावी पास, आयटीआय फिटर, पदविकाधारक, डी.फार्म., बी.फार्म., कोणत्याही शाखेचा पदवीधर, एमबीए, एमसीए, बीटेक, वाहन चालक अशा उमेदवारांची आवश्यकता आहे.
सदर मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देवून  नोंदणी  व अद्यावतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराडील नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन   General Job Fair  यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे ॲप्लाय करावे व रोजगार मेळाव्यास स्वत: हजर रहावे.‍
इच्छूक बेरोजगार उमेदवारांनी  मुलाखतीस येताना स्वत:चा बायोडाटा, दोन फोटो, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींसह मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन, सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड यांनी केले आहे.  
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन