खेळामुळे बुध्दिमत्तेबरोबर शरीरस्वास्थ चांगले राहते -राजेंद्र पवार


           अलिबाग दि. 18 (जिमाका रायगड विशेष वृत्त)-  खेळामुळे बुध्दिमत्तेबरोबर शरिरस्वास्थ चांगले राहत असल्याचे प्रतिपादन शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी आज येथे केले. ते जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली, अलिबाग येथे राज्यस्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी बोलत होते.
यावेळी  उदघाटन समारंभास  रायगडचे अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, मुंबई विभागाचे क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन चे सचिव मिलींद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते व राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रविण बोरसे, रायगड जिल्ह्याचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो पंच सुभाष पाटील हे उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करतांना पवार म्हणाले की, विध्यार्थ्यानी शालेय शिक्षणाबरोबर खेळाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. खेळामुळे जरी विध्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होत असल्यामुळे इयत्ता 10 वी व 12 मध्ये खेळाचे जादा गुण देण्यात येतात. शासनाने 2020 मध्ये होणा-या ऑलिंपीक स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी पदके मिळविण्याच्या अनुषंगाने ऑलिंपीक मिशन 20-20 ही योजना कार्यान्वित केलेली असून पदक मिळण्याची शक्यता असलेल्या 14 विविध खेळांवर लक्ष केंद्रित केलेले असून या योजने अंतर्गत निवडक 61 खेळाडुंवर लक्ष केंद्रित करुन त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, क्रीडा साहित्य व सकस आहारासाठी शासनाकडून संपुर्ण सहकार्य करण्यात येत आहे. तायक्वांदो खेळामध्ये यशस्वी झालेल्या अनेक खेळाडूंना विविध क्षेत्रामध्ये नोकरीची संधी मिळाल्याने त्यांना उपजीवीकेचे साधन मिळाल्याची बाब या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी विचारात घेवून आपल्या कौशल्याचे चांगले प्रदर्शन करुन स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
             स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी या स्पर्धेमधून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडणार असल्याने खेळाडूंनी चांगल्या कौशल्याचे प्रदर्शन करुन राज्याच्या संघात स्थान मिळवावे व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राला जास्तीत जास्त पदके मिळवून द्यावीत असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले.  
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे म्हणाले की. या स्पर्धेत  सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे जवळपास ४० पंच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा क्रीडा परिषद व तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये राज्यातील आठ विभाग़ामधून ५५० खेळाडू, व्यवस्थापक व तांत्रिक अधिकारी सहभागी झालेले असल्याची माहिती देतांना ते म्हणाले, या स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे कोल्हापूर अशा एकुण आठ विभागातून ५० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या प्रारंभी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला. तर अमन साहु या आंतरराष्ट्रीय खेळाडूने स्पर्धेतील खेळाडूंना शपथ दिली. क्रीडा अधिकारी घनशाम राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आजचे निकालः-
१४ वर्षाखालील मुले- १८ किलोखालील वजनगट  - १) जय मोरे, मुंबई 2) पलाश पार्डिकर, नागपूर १८ ते २१ किलो वजनगट  - १) यशराज पवार, मुंबई 2) क्षितीज गजभिये, अमरावती 3) रोशन भेरमुय्या, पुणे व प्रसिक सपकाळे, नाशिक २१ ते २३ किलो वजनगट - १) सुमित जाधव, कोल्हापूर 2) आदित्य मनगटे, औरंगाबाद 3) उमेश नितीरमा, नागपूर व सर्वेश देशमुख, नाशिक २३ ते २५ किलो वजनगट - १) यश कुंभार, पुणे 2) दिनेश चौगुले, कोल्हापूर 3) गौरव कदम, औरंगाबाद व आकाश औटी, मुंबई २५ ते २७ किलो वजनगट - १) जय पाटील, कोल्हापूर 2) जयेश पठारे, औरंगाबाद 3) अक्षय सुर्यवंशी, लातुर व शेख नविन मेहमुद, नाशिक 7 ते ३9 किलो वजनगट  - १) अक्षय पाहुणे, औरंगाबाद 2) सुदर्शन गोरे, पुणे 3) क्षितीज वैद्य, नाग़पूर व ओम पाटील, कोल्हापूर 29 ते 32 किलो वजनगट  1) अभिजित खोपडे, पुणे 2) श्रीधर मलिक, मुंबई 3) जय कांबळे, अमरावती व सिध्दार्थ वायकर, कोल्हापूर  ३२ ते ३५ किलो वजनगट- १) वेदांत चव्हाण, कोल्हापूर 2) रोहित पवार, मुंबई 3) नरेश पाटील, नाशिक व आर्य  खिरे, पुणे ३५ ते ३८ किलो वजनगट - १) सनि पासवान, मुंबई 2) सिध्दार्थ गुरव, कोल्हापूर 3) देवेंद्र जोशी, औरंगाबाद व रोहन लोणारी, नाशिक ३8 ते 41 किलो वजनगट  1) श्रीतेज जागडे, पुणे 2) अलोक मडावी, कोल्हापूर 3) पृथ्विराज थोरबोले, मुंबई व राज देवकर, नाशिक 41 किलोवरील वजनगट- 1) साकीब शेख, मुंबई 2) अमेय सावंत, कोल्हापूर 3) यश भामे, पुणे व रुपेश पाटील, नाशिक१४ वर्षाखालील मुली- १६ किलोखालील वजनगट  - २४ ते २६ किलो वजनगट  - १) अक्षता घाटे, मुंबई 2) जानवी माझीरे, पुणे 3) ज्योती राऊत, कोल्हापूर व निकिता पाटील, नाशिक २६ ते २९ किलो वजनगट  - १) श्रेया इंगोले, पुणे 2) समर्था बने, कोल्हापूर 3) गायत्री बिरावडे, मुंबई व क्षितीजा गाडगे, औरंगाबाद २९ ते ३२ किलो वजनगट - १) ऋतुजा वाघ, मुंबई 2) चेतना बोरसे, नाशिक 3) भाग्यश्री वाढेकर, पुणे व शैला देसाई, कोल्हापूर
00000


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत