आंतरशालेय ब्रँड स्पर्धेचे आयोजन : 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत
अलिबाग,जि.
रायगड (जिमाका) दि.16:- शालेय शिक्षण आणि साक्षरता
विभाग, मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने आंतरशालेय ब्रँड स्पर्धा
सन 2018 चे आयोजन करण्यात येत आहे.
शालेय मुलांच्यामध्ये एकात्मतेची भावना, प्रगल्भता, कृती, धैर्य, देशभक्ती इ.गुण
शालेय मुलांच्यामध्ये वृद्धिंगत होण्यासाठी राज्य, विभाग, राष्ट्रीय अशा तीन
स्तरामधून या स्पर्धांचा यात समावेश आहे.
संपूर्ण भारतातून मध्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर व उत्तर पूर्व
या सहा विभागातून मुले व मुली प्रत्येकी एक संघ याप्रमाणे प्रत्येक
विभागातून राष्ट्रीय ब्रँड स्पर्धेसाठी
संघाची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजयी संघांना प्रथम,
द्वितीय, तृतीय अनुक्रमे रु.वीस हजार, पंधरा
हजार, दहा हजार इतक्या रोख रक्कमेची
पारितोषिके दिली जाणार आहेत.
ब्रँड स्पर्धेसाठी दि.17 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असून अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, नेहूली संगम ता.अलिबाग जि.रायगड येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्री.महादेव
कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment