रायगड जिल्हयातील माजी सैनिकांना रोजगाराची संधी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18:-रायगड जिल्हयातील सर्व माजी सैनिकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी पुर्नवास महानिदेशक, नवी दिल्ली यांचे मार्फत डी जी आर रोजगार सेमिनार दिनांक 25 नोव्हेंबर 2017 रोजी गॅरीजन बटालीयन ग्राउड, आएनएस अश्वनीच्या समोर, कुलाबा मिलीटरी स्टेशन, कुलाबा, मुंबई येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.  
तरी माजी सैनिकांनी आपल्या कागदपत्रासह गॅरीजन बटालीयन ग्राउड, आएनएस अश्वनीच्या समोर, कुलाबा मिलीटरी स्टेशन, कुलाबा, मुंबई या ठिकाणी  मेळाव्यास उपस्थीत राहुन रोजगाराच्या संधीचा लाभ  घ्यावा. असे आवाहन मेजर प्रांजळ. पी. जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0000

Comments