पोषण महिना अभियान पुस्तिकेचे जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते प्रकाशन




अलिबाग दि.31 ऑगस्ट :-  जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण,आरोग्य व ग्रामपंचायत विभागामार्फत  1 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत पोषण महिना अभियान -2019 राबविण्यात येणार आहे.  यासाठी पोषण महिना  पुस्तिका तयार करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांचे कक्षात या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, जिल्हा व महिला बालकल्याण अधिकारी जि.प. श्री. मंडलिक, महिला व बालकल्याण सभापती श्रीम.उमाताई मुंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पोषण महिना अभियान-2019 कार्यक्रम
दि.1 सप्टेंबर जिल्हास्तर,तालुकास्तर आणि अंगणवाडी स्तरावर पोषण महिना उद्घाटन समारंभ व त्याचे सर्व तालुक्यांनी सदरचा कार्यक्रम पाहणे,अंगणवाडी सेविका,अे.एन.एम.,आशा वर्कर यांनी संघटनात्मक सहभागी होणे व उद्घाटन  समारंभाचे आयोजन करणे.  दि.2 सप्टेंबर गणेशोत्सव देखाव्यांमध्ये अभियानाबाबत बॅनर्स,पोस्टर्स लावणे.  दि.3 सप्टेंबर थीम-बालकाचे पहिले 1000 दिवस बाबज जनजागृती करणे,संपुर्ण लसीकरण.  दि.4 सष्टेंबर पोषण भागीदारी-प्रभातफेरी-थीम पोष्टिक आहार.  दि. 5सप्टेंबर सॅम,मॅम बालकांच्या घरी गृहभेटी-थीम-अतिसार,परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि हात धुणे.  दि.6 सप्टेंबर आरोग्य कँप-आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांचे सहकार्याने ॲनिमिया प्रतिबंध.  दि.7 व 8 सप्टेंबर समुदाय आधारित कार्यक्रम (CBE) सुपोषण,अन्न प्राशन दिवस, ओटी भरण, दिवसाचे आयोजन करुन नाटिका,पथनाट्याच्या सहाय्याने जनजागृती करणे.  दि.9 सप्टेंबर सायकल रॅली-वैयक्तिक स्वच्छताबाबत संदेश देणे.  दि.10 सप्टेंबर महिलांच्या आरोग्यविषयी व स्तनपान जनजागृती.  दि.11 सप्टेंबर परसबाग (Kitchen Garden) बद्दल जनजागृती करणे.  दि.12 व 13 सप्टेंबर पोषण पाककृती-लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांच्या सहभागाने पोषण पाककृतीचे आयोजन करुन परिसर स्वच्छता,स्वच्छतागृहांची उपलब्धता,संतुलित आहारांचे महत्व व उपलब्धता इत्यादी बाबत चर्चा घडविणे.  दि. 14 ते 22 शाळा आधारित कार्यक्रम उदा.पोषणे प्रश्नोत्तरी,पोषण विषयक वादविवाद स्पर्धा, कुपोषण, ॲनिमिया, बाळाचे पहिले 1000 दिवस, पोषण घटकांची कमतरता व आजार,सर्वसमावेशक संतुलित आहार या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा.  अंगणवाडी,शाळा आधारित पालक मेळावे.  मुठभर धान्य योजना,थँक यू अंगणवाडी ताई सिडी दाखविणे.  दि.23  व 24 बेटी बचाव-बेटी बढाव कार्यक्रम घेणे, माझी कन्या भाग्यश्री योजनेचे महत्व पटवून देणे.  दि.25 ते 28 सप्टेंबर बचतगट बैठका, चर्चा-विषय ॲनिमिया, योग्य आहार सवयी,वैयक्तिक व परिसर स्वच्छता, स्वच्छ पाणी, वैविध्यपूर्ण आहार, आहार प्रात्याक्षिके व प्रदर्शन इत्यादी.  पथनाट्य-विविध संबंधित विषयांवर, किशोरीकरिता कौशल्य विकास केंद्राना भेटी व मार्गदर्शन इत्यादी.  दि.29 सप्टेंबर महिला व लहान बालकांच्या कौटूंबिक समस्यांबाबत पुरुष  वर्गाच्या जाणीव व जागृतीसाठी बैठक.  दि.30 सप्टेंबर ग्रामपंचायत सभा व VHSND साजरा करणे व समारोप.
०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत