महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना : कातकरी वाड्यांमध्ये शेल्फवर कामे उपलब्ध


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.17:- जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजास कामे उपलब्ध होण्यासाठी आदिवासी कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्ह्यातील आदिवासी (कातकरी) वाड्या असलेल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी  योजनेंतर्गत कामे शेल्फवर उपलब्ध करुन ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. तरी रायगड जिल्ह्यातील इच्छुक आदिवासी (कातकरी) वाडीतील रहिवाशांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामाची मागणी  करताच त्यांना काम उपलब्ध करुन देण्यात येईल. कातकरी समाज बांधवांनी  याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मगांराग्रारोहयो)रायगड अलिबाग यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान