जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचा उपक्रम :शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी चोंढी येथे 26 रोजी महाशिबीर



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग व वकील संघटना अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे चोंढी येथे शासकीय योजनेचा लाभ नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 11 वाजता महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.  या शिबिरात चोंढी व परिसरातील गावांतील  ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे  सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या. हुली  यांनीकेले आहे.
 या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालविकास विभाग, समाज कल्याण विभाग व आरोग्य विभाग यांच्याकडे असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. या महाशिबीरात शासकीय योजनांचे लाभ मिळविण्याकरीता आवश्यक असणाऱ्या अटी पूर्ण करणाऱ्या नागरीकांना त्याचा लाभ मिळणार आहे. महाशिबीरात इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार योजना, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना, पंतप्रधान मातृवंदना योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषिस्वावलंबन योजना इत्यादी इत्यादी शासकीय योजना ठेवण्यात येणार आहेत.  योजनांचा लाभ सदरील गावातील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. महाशिबीराबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग तसेच सदर गावातील ग्रामपंचायतीशी ग्रामस्थांनी संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिरण रायगड अलिबाग यांचा संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02141-223010 असा आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत