शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार : छाननी अहवालावर हरकती मागवल्या


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतीवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. सन २०१४-१५, सन २०१५-१६ व सन २०१६-१७  या तीन वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसंदर्भातील प्राथमिक छाननी अहवाल www.mumbaidivsports.com  या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे. त्यासाठी www.xlroots.com वर क्लिक करावे. या अहवालावर ज्यांना हरकत नोंदवावयाची असेल त्यांनी  20 जानेवारी पर्यत विहित नमुना डाऊनलोड करुन हरकत नोंदवावी व नोंदवलेली हरकत पुन्हा अपलोड करावी, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, यांनी केले आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज