जिल्ह्यातील इंधन पंपांवर वेगनियंत्रक पट्ट्या बसवाव्या-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- रायगड जिल्ह्यातील सर्व इंधन पंपांवर (पेट्रोल व डिजेल) वाहनांना आत व बाहेर येण्या जाण्याच्या मार्गावर वेगनियंत्रक पट्ट्या ( Rumbler Strips) बसवाव्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  दिले आहेत. जिल्ह्यातील पंप मालकांनी येत्या महिनाभरात  या पट्ट्या बसवावयाच्या आहेत. यासंदर्भात संबंधित तहसिलदारांनी स्थळ निरिक्षण अहवाल सादर करावा, असे निर्देशही डॉ. सुर्यवंशी यांनी  दिले आहेत.
 जिल्ह्यातील सर्व राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, इतर जिल्हा मार्गांवर असणारे इंधन पंपांवर घडलेल्या अपघातांच्या घटना घडल्याचे निदर्शनास आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.  अनेकदा इंधन भरून आल्यावर वेगाने बाहेर जातांना रस्त्यावरील वाहनांशी अपघात होतात. त्यासाठी या पंपांच्या आत व बाहेर जाण्याच्या मार्गावर वेगनियंत्रक पटट्या बसविण्यात याव्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  याबद्दल सर्व तहसिलदारांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पंप मालकांची बैठक घेऊन  त्यांना या बाबीचे महत्त्व पटवून द्यावे व  पंपधारकांनी या पट्ट्या बसवाव्यात . यामुळे पेट्रोल डिजेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांना  सुरळीत पणे ये जा शक्य होईल. तहसिलदारांनी पंपधारकांना 30 दिवसांची मुदत देऊन वेगनियंत्रक पट्ट्या बसविल्याची स्वतः खात्री करुन  स्थळ निरीक्षण अहवाल सादर करावा, असेही निर्देश दिले आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज