इ.1 ली ते इ.8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना कार्यान्वित

 


अलिबाग, दि.23 (जिमाका) :- समग्र शिक्षांतर्गत इ. 1 ली ते इ. 8 वी मध्ये शिकणारी कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, यासाठी शासनाने समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरु केली आहे. इ. 1 ली ते इ. 8 वी शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या 1 लाख 74 हजार 456 विद्यार्थ्यांना 9 लाख 77 हजार 173 पाठ्यपुस्तके शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करू नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करून दिली जातील, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  श्रीमती पुनिता गुरव यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक