जिल्ह्यातील निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अदालतीचे आयोजन

 


जिल्ह्यातील निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अदालतीचे आयोजन

अलिबाग, दि.23 (जिमाका) :- महालेखापाल, मुंबई यांच्या निर्देशानुसार सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग यांनी जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी निवृत्तीवेतन अदालत आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांसाठी जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत गुरुवार, दि.26 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वा. जंजिरा सभागृह, पोलीस मुख्यालय अलिबाग येथे निवृत्तीवेतन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.    

               जिल्ह्यातील निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी  या अदालतीकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी माधव रामा सराई यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज