प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 30 मे रोजी साधणार अनाथ बालकांशी ऑनलाईन संवाद
अलिबाग, दि.27 (जिमाका):- प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत दि.30 मे 2022 रोजी प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी हे दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील अनाथ बालकांशी संवाद साधणार असून
या कार्यक्रमामध्ये रायगड जिल्ह्यातील अनाथ मुलेही सहभागी होणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील
26 अनाथ बालकांना स्नेह प्रमाणपत्र व प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे पत्र देण्यात येणार
असून विविध लाभांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत अनाथ बालकांसाठी विविध
लाभ देण्यात येतात. या अंतर्गत प्रधानमंत्री श्री.मोदी हे सोमवार, दि.30 मे 2022 रोजी
देशभरातील अनाथ बालकांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्हर्च्युअल पद्धतीने) संवाद साधणार
आहेत.
या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील 26 अनाथ बालके जिल्हाधिकारी कार्यालयातून
सहभागी होणार आहेत. या बालकांना प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे पत्र, पीएम केअर योजनेचे
स्नेह प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेचे कार्ड, पोस्ट खात्याचे पासबुक आदींचे
वितरण करण्यात येणार आहे.
00000
Comments
Post a Comment