सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु
अलिबाग, दि.24 (जिमाका): सामाजिक न्याय
विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हे गौरीनंदन अपार्टमेंट, गणेशमंदीर
शेजारी, विजय नगर, वरसोली- अलिबाग, जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहाची मान्य
संख्या 75 आहे.
या वसतिगृहात
इ.8 वी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे
आहे:- अनुसूचित जाती- 80 टक्के अनुसूचित जमाती- 03 टक्के, विमुक्त जाती, भटक्या
जमाती- 05 टक्के, आर्थिक मागास व इतर मागास वर्गातील दारिद्रयरेषेखालील कुटूंबातील
विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग- 02 टक्के, अनाथ- 02 टक्के, अपंग- 03
टक्के.
या वसतिगृहामध्ये
गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. वसतिगृहात विद्यार्थ्याकरिता मोफत निवासव्यवस्था आहे.
वसतिगृहामध्ये नाष्टा व भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे. नाश्ता :- दररोज पाहे/ शिरा/उपीट
इ. पैकी एक आलटून पालटून तसेच उकडलेली दोन अंडी, एक सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ
व दूध दररोज नाष्ट्यासाठी विनामूल्य देण्यात येते. भोजन व्यवस्था :- दुपार व सायंकाळी जेवण ( डाळ,
भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड, सलाड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात
येतो.
वसतिगृहामध्ये
8 वी ते 10 वी च्या प्रवेशितांना अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व
लेखन साहित्य देखील विनामुल्य पुरविले जाते.
तसेच 11 वी पासून पुढील इयत्तेत शिकणाऱ्या प्रवेशितांना रुपये 4 हजार वार्षिक शैक्षणिक
साहित्य खरेदी भत्ता देण्यात येतो. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून रु600/-
मासिक निर्वाहभत्ता दिला जातो. शालेय व गणवेष पात्र महा. विद्यार्थ्यांना दोन संचाकरिता
गणवेष भत्ता/ रेनकोट/छत्री भत्ता दिला जातो. हे भत्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा
करण्यात येतात. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रिडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक
सुविधा उपलब्ध आहेत.
प्रवेशपात्र
विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व मार्गानी वार्षिक उत्पन्न अनु.जाती, अनु.जमाती विद्यार्थींनीकरिता
रुपये 2 लाख 50 हजारचे आत, विमुक्त जाती, भटक्या
जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, अंपग व अनाथ विद्यार्थ्यांकरिता रुपये
1 लाखाच्या आत असावे.
ऑफलाईन प्रवेश
अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांचे सहीचा सन 2021-22 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे सक्षम
अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, मागील इयत्ता पास
झाल्याचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, बँक खाते पासबूक झेरॉक्स, रहिवासी दाखला,
पासपोर्ट साईज फोटो- 2 आधारकार्ड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.
सन 2022-23 या
शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध करण्यात आले
आहेत. अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अलिबाग
एस.एफ.कदम यांच्याशी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन
गृहपाल एस.एफ.कदम यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment