कर्जत तहसिलदार कार्यालय व रक्षा सामाजिक विकास मंडळ यांच्यातर्फे दि.28 मे रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन
अलिबाग, दि.26 (जिमाका):- तहसिलदार कर्जत कार्यालय व कर्जत तालुका आणि परिसरात शोध आणि विमोचन कार्यामध्ये आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यात सदैव अग्रेसर असलेली रक्षा सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वादळ, पूरपरिस्थिती उपाययोजना व प्राथमिक प्रथमोपचार अशा आपत्ती व्यवस्थापन विषयांवर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात रायगड जिल्हा व परिसरात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती येऊन खूप मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी व वित्तहानी झाली. कर्जत तालुक्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विषयावर सजग करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामार्फत (NDRF) देण्यात येणार आहे. शनिवार, दि.28 मे 2022 रोजी हे कर्जत येथे आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रशिक्षणात सहभागी होऊन आपत्ती व्यवस्थापन कार्यात अग्रेसर कार्य करावे.
अधिक माहितीसाठी रक्षा सामाजिक विकास मंडळ 9421008778, 02148223704 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/
00000
Comments
Post a Comment