समग्र शिक्षाअंतर्गत शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना दिली जाणार पाठ्यपुस्तके ---शिक्षणाधिकारी श्रीमती पुनिता गुरव

 

 

अलिबाग,दि.8(जिमाका):-समग्र शिक्षाअंतर्गत इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडथळा येवू नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शासनाने समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरु केली आहे.

      इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी च्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या 1 लाख 89 हजार 274 विद्यार्थ्यांना 7 लाख 81 हजार 561 पाठ्यपुस्तके (एकात्मिक पुस्तक संच) शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत.

      जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करु नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करुन दिली जातील, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद श्रीमती पुनिता गुरव यांनी केले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज