अलिबाग मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळयाचे यशस्वी आयोजन

 

 

अलिबाग, दि.7:- अखंड हिंदुस्थान आणि स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा अलिबाग शहरामध्ये मंगळवार दि.6 जून 2023 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अणि मंगलमूर्ती वाद्य पथक, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिमाखात संपन्न झाला.

      कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिवाजी चौकात मशाली पेटविण्यात आल्या. मंगलमूर्ती वाद्य पथकांनी याप्रसंगी ढोल व ताशा वादन केले तसेच जय हनुमान लाठी काठी पथक, भोनंग यांनी लाठी काठी व मर्दानी खेळांचे प्रदर्शन केले.

  छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर अलिबागचा बाल मावळा कैवल्य म्हात्रे यांनी व्याख्यान सादर केले. तर मुंबई विद्यापीठामध्ये सुवर्ण पदक विजेते श्रीराम ठोसर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिले. अक्षय म्हात्रे यांचे स्ट्रींग फॅमिली या संगीत संचाने सूर मराठी मातीचा उत्सव शिव स्वराज्याचा हा संगीत व बहारदार गीत कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात शिवाजी महाराजांवर विविध गीत व पोवाडे गायले गेले.

 कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अणि मंगलमूर्ती वाद्य पथकाचे सुलदिप नाईक, यश म्हात्रे, अ.भा.वि.प. जिल्हा संयोजक वैष्णव देशमुख, प्रल्हाद घरत, शुभम नखाते विनय वाडकर, पारस जैन, अमेय जाधव, प्राथम घोडींदे या सोबत दुर्गरक्षक सामाजिक प्रतिष्ठान चे कपिल अनुभवणे, आकाश राणे, सिद्धार्थ नाईक यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज