दि.1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

 

 

अलिबाग,दि.9(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने दि.1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दि.01 जून 2023 ते दि.16 ऑक्टोबर 2023 पर्यंत पुनरिक्षण पुर्व कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केला आहे. तसेच पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध करावयाची असून दि. 5 जानेवारी 2024 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करावयाची  आहे.

 या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे एसएसआर 24 चा कार्यक्रम विहित कालमर्यादेत व अचूकरित्या पूर्ण करावयाचा आहे. त्याकरिता ठरवून दिलेला कार्यक्रम प्रथम टप्प्यात दि.01 जून 2023 ते दि.20 जून 2023 या कालावधीत मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकरिता आवश्यक त्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर घरोघरी भेटी देऊन प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया संबधित मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आवश्यक प्रमाणपत्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यामार्फत मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे.

 त्याचप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे प्रत्येक टप्यावर राजकीय पक्षांबरोबर बैठक घेऊन त्याबाबतची इतिवृत्ते (मराठी, इंग्रजी) संबंधित उपस्थितांच्या स्वाक्षरीसह जतन करून ठेवावयाची आहे.  तसेच या कालावधीत प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतीच्या याद्या मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना नियमित उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत.  त्याबाबतची पोच जतन करावयाची आहे. त्याचप्रमाणे आयोगाने निर्देश दिल्याप्रमाणे पारदर्शकतेबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज