विद्यार्थ्यांसाठी सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन विषयावर कार्यशाळा संपन्न


 

अलिबाग,दि.14(जिमाका): जेएसएम महाविद्यालय,अलिबाग येथे वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग तर्फे विद्यार्थ्यांसाठी सर्प आणि निसर्गासोबत सहजीवन या विषयावर शनिवार, दि.11 फेब्रुवारी रोजी कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत सापांबद्दल शास्त्रीय माहिती, अलिबाग आणि भोवतालच्या परिसरात आढळणारे साप तसेच सर्पदंश कसे टाळावेत आणि सर्पदंश झाल्यास करावयाच्या उपाययोजना याबाबतचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले.,

यावेळी डॉ.प्रसाद दाभोळकर, ओमकार कामतेकर आणि अदिती सगर यांनी संगणकीय सादरीकरणाराद्वारे याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अलिबाग तालुक्यात वन्यजीव विशेषत: साप,पक्षी यांचा बचाव तसेच प्रथमोपचार करण्याचे सेवाभावी कार्य करत आहे.

यावेळी जेएसएम महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील, मुख्याध्यापक डॉ.अनिल पाटील, उपमुख्याध्यापिका डॉ. सोनल पाटील, जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.अद्वैत घाटपांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनील आनंद, डॉ. मीनल पाटील तसेच वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग चे सक्रिय कार्यकर्ते पारस घरत, सुजित लाड आणि समीर पालकर हे उपस्थित होते.

000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज