रायगड जिल्हा कृषी महोत्सव-2023 कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी भेट द्यावी--जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उदघाटन


अलिबाग,दि.7 (जिमाका):- दि.09 फेब्रुवारी ते दि.13 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये सेक्टर 27, सिडको मैदान, खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ, कामोठे, पनवेल येथे रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते होणार असून या संपूर्ण कृषी महोत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.

       जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023, शासनाच्या विविध कृषी योजना/उपक्रमांची माहिती, कृषी तंत्रज्ञान, नाविण्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी बाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद, प्रात्याक्षिके, कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी/उद्योजकांची व्याखाने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य, कडधान्ये व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव इत्यादीचे आयोजन करण्यात येणार आहे.

      या रायगड जिल्हा कृषी महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

०००००००


Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज