शैक्षणिक विशेष माफीद्वारे बंद्यांचे सुधारणा व पुनर्वसन उपक्रम


 

अलिबाग,दि.7 (जिमाका):- अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकारात दि.03 ऑक्टोबर 2019 ते दि.31 जानेवारी 2023 या कालावधीत 89  शिक्षा बंद्यांना 90 दिवसांची विशेष माफी मंजूर करण्यात आली आहे. तसेच विभागीय कारागृह उपमानिरीक्षक यांचे अधिकारातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 6 बंद्यांना 60 दिवसांची विशेष माफी देण्यात आलेली आहे.

राज्यातील कारागृहातील बंद्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे तसेच बंद्यांमध्ये सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्व यांची जाणीव विकसित व्हावी, त्याकरिता बंद्यांना शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच जास्तीत जास्त बंद्यांनी  शैक्षणिक सुविधेचा लाभ घ्यावा व सहभाग नोंदवावा याकरिता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, दिल्ली यांच्या संयुक्त उपक्रमानुसार कारागृहात अभ्यासकेंद्र व परीक्षाकेंद्र सन 2014 पासून सुरु करण्यात आले आहेत.

कारागृहातील परीक्षा केंद्रातून दहावी/बारावी समकक्ष पदविका/पदवी/पदव्युत्तर/ प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बंद्यांनी 10  वी, 12 वी समकक्ष/बी.ए./बी.कॉम/एम.ए.इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण पदवी घेतलेल्या आहेत.

या उपक्रमाद्वारे बंद्यांचे सुधारणा व पुनर्वसन होऊन कारागृहातून मुक्त झाल्यावर सुशिक्षित नागरिक म्हणून समाजात चांगले जीवन जगण्यास प्रवृत्त होईल व स्वतः आर्थिक उत्पन्न मिळवून स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहील व स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घेऊ शकेल. शिक्षणाचे महत्व व शिक्षणाचा जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम या संकल्पनेने शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य करू शकेल अशी कारागृह प्रशासनाची धारणा आहे, असे जनसंपर्क अधिकारी कार्यालय, करागृह मुख्यालय, पुणे यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज