किमान आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीसाठी अंतिम मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत

 

 

अलिबाग,दि.09(जिमाका): खरीप हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीसाठी 15 फेब्रुवारी 2023 ही अंतिम तारीख आहे. या तारखेनंतर कोणत्याही शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धान व भरडधान्य दि.15 फेब्रुवारी 2023 पूर्वी खरेदी केंद्रावर घेऊन यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.

 किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरड धान्य खरेदीसाठी दि.31 जानेवारी 2023 ही अंतिम तारीख होती. मात्र राज्य शासनाने ही मुदत वाढवून दि.15 फेब्रुवारी 2023 ही अंतिम तारीख घोषित केली.

  विभागातील शेतकऱ्यांनी जवळील खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा. योजनेचा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्यांची धान खरेदी करण्यात येणार नसल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत