कर्करोग माहिती सत्र कार्यशाळा, आभा कार्ड नोंदणी व कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न

 


 

अलिबाग,दि.6(जिमाका) :- जागतिक कर्करोग दिन या दिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप अंतर्गत कोपरी या गावामध्ये दि.04 फेब्रुवारी 2023 रोजी हेल्प एज इंडिया फाऊंडेशन आणि सिप्ला कंपनी यांच्या  सहकार्यातून कर्करोग माहिती सत्र कार्यशाळा व आभा कार्ड नोंदणी आणि कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यशाळेचे उद्घाटन खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद रोकडे व सिप्ला कंपनी सीएसआर अधिकारी श्रीमती उल्का धुरी यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा पाईकराव यांनी कर्करोग निदान तसेच नियमित आरोग्य तपासणी, आभा कार्ड, असंसर्गजन्य आजार या शासनाच्या आरोग्य कार्यक्रमामधील कर्करोगाचे निदान, उपचार व कार्यप्रणाली बाबतची माहिती लाभार्थ्यांना दिली. डॉ. प्रसाद रोकडे यांनी आरोग्य कसे जपले पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.  तर श्रीमती उल्का धुरी यांनी  कर्करोग पॅलिटिव्ह केअर साठी सिप्ला कंपनीच्या सहकार्याने हेल्प एज इंडिया फाऊंडेशन कशा प्रकारे काम करीत आहे, याबाबत माहिती दिली. पाताळगंगा सीएसआर प्रमुख सुनिल मकरे यांनी पॅलिटिव्ह केअर आणि साथ साथ या टोल फ्री  क्रमांकाबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. हेल्प एज इंडिया फाऊंडेशन चे सहकारी संतोष भुजबळ, राजेंद्र कसबे यांनी आरोग्य जनजागृती करीत असताना लोकसमुदायास आभा कार्ड चे महत्व समजावून लाभार्थ्यांची आभा कार्ड नोंदणी करून घेतली व त्या कार्डचे वाटपही केले.

या कार्यशाळेमध्ये कोपरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत