खारघरमध्ये केंद्रीय संचार ब्युरोमार्फत मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन केंद्र सरकारच्या विविध सरकारी योजना, उपक्रम यांची माहिती मिळवण्याची संधी


रायगड दि. 6-- भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने नवी मुंबईतील लिटल वर्ल्ड मॉल, खारघर येथे मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवार, दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून येथे येत्या 7, 8 आणि 9 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.



सदर मल्टीमीडिया प्रदर्शनात केंद्र सरकारमार्फत गेल्या 9 वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम यांच्याबाबत माहिती चित्रे आणि डिजिटल स्वरुपात दाखवण्यात येईल. भारतीय टपाल विभागांच्या विविध योजना आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षसंदर्भात माहितीही यामध्ये मिळेल. सोबतच स्थानिक तहसील कार्यालयामार्फत मतदार नोंदणी शिबीरही यावेळी राबवण्यात येईल.

पनवेल आणि खारघर परिसरातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मिळून त्याचा लाभ घेता यावा, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. मल्टीमीडिया प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असून खारघर, पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज