माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी यांना महासैनिक पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन


रायगड जिमाका दि. 7--सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यातर्फे सर्व डाटा डिजीटलायजेशन /संगणकीकरण करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी रायगड जिल्हयामधील सर्व माजी सैनिक आणि माजी सैनिक विधवा पत्नींना व अवलंबिताना www.mahasainik.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी. 


 नोंदणी न केलेल्या सैनिक आणि संबंधित यांना महाराष्ट्र राज्यात देण्यात येणाऱ्या सुविधा मिळणार नाहीत. या नोंदणीसाठी माजी सैनिकांना  रु. 100  शुल्क आकारण्यात येणार आहे, तर माजी सैनिक विधवा व अवलंबिताना हे शुल्क माफ आहे.


नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे 

१) फोटो २) आधारकार्ड ३) पॅनकार्ड ४) बैंक पास बुकचे पहिल्या पानाची छायांकीत प्रत

ई) सैन्यसेवा पुस्तक सर्व पृष्ठांची छायांकित प्रत उ) पीपीओ.

ऊ) माजी सैनिक ओळखपत्र

ए) ECHS कार्ड ऐ)पेंशन बैंक पासबुक पहीले पृष्ठ


तरी सर्वांनी महासैनिक पोर्टलवर आपले नोंदणी करून घ्यावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग ले. कर्नल राहुल बैजनाथ माने (निवृत)  यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत