ग्रंथ पूजन करून ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न
रायगड,दि.20(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने "ग्रंथोत्सव 2024" चे उद्घाटन महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, पेण येथे संपन्न झाले.
यावेळी एस.एन.डी.टी.विद्यापीठ मुंबई मराठी विभाग प्रमुख, डॉ.अनंत देशमुख, सहाय्यक संचालक कोकण भवन प्रकाश पाटील, सार्वजनिक वाचनालय, अलिबाग, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलाताई पाटील, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोदार्डे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, रायगड जिल्हा ग्रंथालय सदस्य नागेश कुलकर्णी, महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष श्री.वनगे आदि उपस्थित होते.
यावेळी मागदर्शन करताना श्री.देशमुख म्हणाले की, मी जे काही घडलो ते पुस्तकामुळे त्यामुळे माझ्या आयुष्यात पुस्तकाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. प्रत्येकाला ग्रंथांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे काम करतात. ग्रंथ हे गुरु, मित्र, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका बजावत असतात.
श्रीमती शैलाताई म्हणाल्या की,वाचन सांस्कृतिचा ओठा ग्रंथालयात कसा येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकाला ग्रंथापालने पुस्तकाचे महत्व पटवून दिले पाहिजे. ग्रंथपाल हा पुढील पिढी घडवणारा प्रमुख दुवा आहे.
यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. प्रथम ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन राज्यगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती शोभना पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर शेठ यांनी केले.
0000
Comments
Post a Comment