जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीची पुर्नगठीत करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन
रायगड(जिमाका)दि.19:-कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अन्वये जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती (LCC) पुर्नगठित करण्यात येणार आहे. तरी पात्रताधारक इच्छुकांनी दि.27 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष व 3 सदस्य यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी खालीलप्रमाणे निकष आहेत.
अध्यक्ष पदासाठी-सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेली आणि महिलांच्या हिताशी बांधिलकी असलेली मान्यवर महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
एक सदस्य-जिल्ह्यातील गट, तालुका, तहसिल, प्रभाग, नगरपालिका या पातळीवर कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिला तर दोन सदस्य-महिलांच्या हितासाठी बांधिल असलेल्या संस्था, संघटना मधील महिला किंवा पुरूष व्यक्ती जिला कायद्याचे ज्ञान असेल यापैकी 1 सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. समाजिक कायद्याचे ज्ञान असलेली महिला.
या समितीमधील निवड झालेले अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीचा कालावधी 3 वर्षाचा राहिल. या समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी गैरवर्तन केल्यास समितीतून काढले जाईल.
यामध्ये कलम 16 चे उल्लंघन केल्यास, एखाद्या गुन्ह्याची शिक्षा झाल्यास किंवा कोणत्याही कायद्याखाली गुन्ह्याची चौकशी चालु असल्यास.शिस्त भंगाची कारवाई झाल्यास किंवा शिस्त भंगाबाबत चौकशी चालू असल्यास अथवा पदाचा गैरवापर केल्यास पद रद्द करण्यात येईल.
सदर नामनिर्देशन करीता अर्जदाराचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक, समितीतील पद, शैक्षणिक पात्रता, अनुभव, आधारकार्ड इ. संपूर्ण कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दीप महल बंगला, दुसरा मजला, स्वामी समर्थ नगर, पिंपळभाट-चेंढरे, रायगड-अलिबाग या कार्यालयास दि.27 मार्च रोजी सायं. 6.00 वा. पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment