निवडणूकीचे काम पारदर्शक, नियोजनबध्द व निपक्षपातीपणे करावे -जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी


अलिबाग (जिमाका) दि.25 : जिल्ह्यातील सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूकीचे काम पारदर्शक,नियोजनबध्द व निपक्षपातीपणे करावे, असे निर्देश  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी  यांनी आज दिले.
  पी.एन.पी.नाट्यगृह अलिबाग येथे आयोजित विधानसभा निवडणूक 2019 आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे तसेच विविध समिती प्रमुख व सदस्य उपस्थित होते.
डॉ.सर्यवंशी म्हणाले,निवडणूकी संदर्भातील सर्व समिती प्रमुख व सदस्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.  सर्व समिती प्रमुखांनी आपल्या सदस्यांकडून चांगले काम करुन घ्यावे.   निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  निवडणूक काळात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून उल्लघंन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.  निवडणूक प्रचार काळात सर्व समित्यांनी आपआपल्या दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित व प्रामाणिकपणे पार पाडाव्यात.   व्हिडिओ पाहणी पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथक व भरारी पथक यांनी आपली जबाबदारी पारपाडताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.  आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल ॲप विकसित केले आहे त्याचा योग्य तो वापर करावा. 
आजच्या प्रशिक्षण कार्यक्रमात एक खिडकी योजना,व्हिडोओ सर्वेक्षण पथक, व्हिडोओ पाहणी पथक, भरारी पथक,स्थिर सर्वेक्षण पथक,लेखाकंन टिम,बँक खाते, लेख्यातील त्रुटी, खर्च निरीक्षक व त्यांचे अहवाल, सहा.खर्च निरिक्षकांची कामे व भूमिका, cVigil, प्रसार माध्यमे प्रमाणीकरण व आदर्श आचारसंहिता अंमलबाजवणी आदि समित्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज