पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना चला विकसित करु या आपले पशुधन...!

 

विशेष लेख क्र.5                                                                                  दिनांक :- 17 फेब्रुवारी 2021


सन 2020-21 या वर्षात महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राज्यात राबविण्यात येणार आहेत. ही योजना रायगड जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे. चला तर मग या योजनांचा लाभ घेऊन आपले पशुधन विकसित करु या...!

6/4/2 दुधाळ संकरीत गायी/म्हशींच्या गटाचा पुरवठा करणेः- या योजनेमध्ये पशुपालकास 6/4/2 दुधाळ संकरित गायी, म्हशी खरेदी करता येतात. 6 जनावरांच्या गट खरेदीसाठी प्रकल्प अहवालानुसार एकूण रू.3 लाख 35 हजार 184/-, 4 जनावरांच्या गटासाठी रू.1 लाख 70 हजार 125/- व 2 जनावरांच्या गटासाठी रू.85 हजार 061/- रक्कम निश्चित करण्यात आली असून या रक्कमेच्या 50 टक्के अनुदान सर्वसाधारण प्रवर्गातील लाभधारकास व 75 टक्के शासकीय अनुदान विशेष घटक प्रवर्गातील लाभधारकास अनुज्ञेय आहे. उर्वरित रक्कम लाभार्थीने स्वतः अथवा वित्तीय संस्थामार्फत कर्ज घेवून उभारावयाची आहे.

लाभधारक निवडीचा प्राधान्यक्रम महिला बचतगट लाभार्थी, अल्पभूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार याप्रमाणे असणार आहे.

रायगड जिल्ह्याला सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 62 लाभार्थ्यांसाठी रू.26 लाख 36 हजार 860 व विशेष घटक प्रवर्गासाठी एकूण 19 लाभार्थ्यांसाठी रू.12 लाख 01 हजार 750 चे आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.

 राज्यामध्ये मासंल कुक्कुटपक्षी पालन व्यवसाय सुरू करणे- या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पक्षीगृह (1 हजार चौ.फू.) स्टोअर रूम, पाण्याची टाकी, निवासाची सोय व विद्युतीकरण यासाठी रू.2 लाख व उपकरणे, खाद्याची/पाण्याची भांडी, बृडर यासाठी रू.25 हजार अशा एकूण 2 लाख 25 हजार रकमेच्या 50 टक्के अनुदान सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीसाठी व विशेष घटक प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75 टक्के अनुदान अनुज्ञेय आहे. अनुदानाव्यतिरिक्त उर्वरीत रक्कम लाभार्थीने स्वतः अथवा वित्तीय संस्थांकडून कर्जरूपाने उभारावयाची आहे. या योजनेमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून जिल्ह्यात लघु अंडी उबवणी यंत्र घेतलेल्या लाभधारकांचा प्राधान्याने विचार करण्यात येणार असून तद्नंतर जिल्ह्यातील पात्र लाभार्थीचा मार्गदर्शक सूचनांप्रमाणे योजनेच्या लाभासाठी विचार करण्यात येईल.

रायगड जिल्ह्याला सर्वसाधारण प्रवर्गासाठी 11 व विशेष घटक प्रवर्गासाठी 3 चे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. जिल्ह्याला सर्वसाधारण प्रवर्गासाठी रू.12 लाख 37 हजार 500 व विशेष घटक प्रवर्गासाठी रू.3 लाख 37 हजार 500 चे आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.

 अंशतः ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी 10 शेळया व 1 नर बोकड गटाचा पुरवठा करणे- या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत 10 शेळया व एक बोकड खरेदीसाठी रू.45 हजार,  गोठा उभारणी- रू.15 हजार 750, आरोग्य सुविधा व औषधोपचार- रू.1 हजार 150, खाद्याची व पाण्याची भांडी रू.1 हजार, विमा रू.1 हजार 986, असे एकूण रू.64 हजार 886 या किंमतीच्या 50 टक्के अनुदान सर्वसाधारण प्रवर्गासाठी व 75 टक्के अनुदान विशेष घटक प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी अनुज्ञेय आहे. अनुदानाव्यतिरिक्त उर्वरीत रक्कम लाभार्थीने स्वतः अथवा वित्तीय संस्थांकडून कर्जरूपाने उभारावयाची आहे.

रायगड जिल्हयाला सर्वसाधारण प्रवर्गासाठी 41 व विशेष घटक प्रवर्गासाठी 11 चे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. जिल्ह्याला सर्वसाधारण प्रवर्गासाठी रू.13 लाख 30 हजार 163 व विशेष घटक प्रवर्गासाठी रू.7 लाख 76 हजार  चे आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.

या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचतगट या प्राधान्यक्रमानुसार योजनेच्या लाभासाठी विचार करण्यात येणार आहे. तसेच शासन निर्णयानुसार 3 टक्के विकलांग व 30 टक्के महिला लाभधारकांची निवड करण्यात येईल.  प्राप्त व पात्र अर्जांमधून लाभार्थींची निवड जिल्हाधिकारी  रायगड  यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी व पशुपालक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज दि.16 फेब्रुवारी ते दि.25 फेब्रुवारी 2021 पर्यंत या कालावधीत त्यांच्या तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावयाचे आहेत.

अधिक माहितीसाठी, अर्जाचा नमुना व अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे याबावत आपल्या तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी अथवा आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

या योजना राबविण्यासाठी कालमर्यादा असल्याने दि.25 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्राप्त होणाऱ्या परिपूर्ण अर्जांचाच विचार करण्यात येईल, असे जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त, रायगड-अलिबाग डॉ.सुभाष म्हस्के यांनी कळविले आहे.

 

  मनोज शिवाजी सानप

 जिल्हा माहिती अधिकारी

                                                                                           रायगड-अलिबाग

00000000

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज