वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी अर्ज करावेत
अलिबाग,जि.रायगड,दि.17
(जिमाका) :-
वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या राज्यातील
व्यक्ती व संस्थांना दरवर्षी महसूल विभाग
व राज्यस्तरावर विविध 5 संवर्गात “छत्रपती
शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार” या पुरस्काराने सन्मानित
करण्यात येते.
सन 2019 या वर्षाकरिता या पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज
जिल्हास्तरावरील विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्या कार्यालयास
दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत सादर करावेत तसेच अधिक माहितीकरिता सामाजिक वनीकरण
मध्यवर्ती रोपवाटिका, अलिबाग-रेवस रोड, मु.लोणारे, पो.थळ, ता.अलिबाग येथे प्रत्यक्ष
वा 02141-238474 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन
अधिकारी, सामाजिक वनीकरण, रायगड-अलिबाग आप्पासाहेब निकत यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment