कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी जिल्ह्यातील विविध भागांचा केला दौरा विविध कृषी योजनांचा घेतला आढावा अन् लाभार्थी शेतकऱ्यांशी केली चर्चा

 


अलिबाग,जि.रायगड,दि.15 (जिमाका):- कृषी विद्यान के़ंद्र किल्ला ता.रोहा येथे (दि.13 फेब्रुवारी) रोजी कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या शुभहस्ते "विकेल ते पिकेल" अंतर्गत विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट, रोहा व आत्मा, रायगड यांच्या संयुक्त निधीमधून भाजीपाला विक्रीसाठी विक्री किटचे  वाटप करण्यात आले.

      यावेळी विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग- ठाणे श्री.लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम.उज्वला बाणखेले, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी,माणगाव सतिश बोराडे, उपप्रकल्प संचालक आत्मा सिताराम कोलते, व्ही.आर.टी.आय संस्थेचे सुशील रुळेकर, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव, मंडळ कृषी अधिकारी महादेव करे, अमोल सुतार, कृषी सहायक कु.उबाळे, श्रीम.दोरूगडे, शेतकरी  लिंबाजी थिटे, नारायण जाधव, अशोक जाधव उपस्थित होते.

       मौजे.कुडली ता.रोहा  येथे (दि.13 फेब्रुवारी) रोजी कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी "एकात्मिक फलोत्पादन अभियान" अंतर्गत मोहन राव यांच्या शेतावर सामूहिक शेततलाव पाहणी केली. यावेळी या गावामधील एकूण 8 सामूहिक शेततलावांबाबतची माहिती शेतकरी लाभार्थ्यांनी आयुक्तांना दिली. संबधित सर्व शेतकरी शेततलावामध्ये मस्त्यपालन करीत असून शेत तलावातील पाण्याचा वापर त्यांनी काजू व आंबा बागेसाठी ठिंबक सिंचनाद्वारे केला आहे.    

      तसेच "कै.भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड" अंतर्गत श्री.संदिप कृष्णा कडू यांच्या शेतावर 1 हेक्टर क्षेत्रावर काजू फळबाग लागवड पाहणी केली. यावेळी  शेतकरी लाभार्थी लागवड , खतव्यवस्थापन, ठिबक सिंचन, काजू प्रक्रिया याबाबत सविस्तर चर्चा झाली.

      कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी मौजे आधरणे, ता.पेण येथे जिल्हा नियोजन विकास योजनांतर्गत सन 2019-20 मध्ये झालेल्या  (काँक्रीट) सिमेंट नाला बंधाऱ्याची  पाहणी करुन बंधारा होण्यापूर्वीची परिस्थिती व बंधारा झाल्यानंतर बदल झालेल्या परिस्थितीबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि घेतलेल्या भाजीपाला क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांना झालेल्या  लाभाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजीपाला पिकविणाऱ्या आदिवासी  शेतकऱ्यांनी शेतात बनविलेल्या कुडाच्या घराबाबत आस्थेने चौकशी करून समाधान व्यक्त केले. 

     या पाहणी दौऱ्यात विभागीय कृषी सहसंचालक कोकण श्री. लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड - अलिबाग उज्वला बाणखेले, उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग दत्तात्रय काळभोर, तालुका कृषी अधिकारी, पेण अनिल रोकडे, मंडळ कृषी अधिकारी श्री.पाटील व कृषी सहाय्यक हनुमंत शेलार, सबाजी पोटे व शेतकरी उपस्थित होते.

     यानंतर कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी मौजे सावरसर्ई ता.पेण येथे "पाणलोट विकास कार्यक्रम" योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभ योजना, उपजीविका  व बचतगट निधीबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून मार्गदर्शनही केले. शिवाय शेतकऱ्यांना झालेल्या लाभाबाबत जिल्हा परिषद सदस्य श्री.महादेव दिवेकर, सातबारा सरपंच देवकी दरवडा, उपसरपंच तृप्ती पाटील, पाणलोट अध्यक्ष सुरेश पाटील, पाणलोट सचिव वामन दरवडा, प्रगतीशील शेतकरी रामचंद्र होला, ग्रामपंचायत सदस्य माया वाघ व कर्मचारी श्री.पडवळ व इतर प्रगतशील शेतकरी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या दौऱ्यात विभागीय कृषी सहसंचालक कोकण श्री. लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले , उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग श्री.दत्तात्रय काळभोर, तालुका कृषी अधिकारी पेण श्री.अनिल रोकडे , मंडळ कृषी अधिकारी श्री.पाटील, कृषी सहाय्यक श्री.हनुमंत शेलार, श्री.सबाजी पोटे व श्री विष्णू लांडगे व इतर शेतकरी उपस्थित होते.

     मौजे पिंपळगाव, ता.पेण येथे "राष्ट्रीय कृषी विकास" योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सन -2020-21 अंतर्गत लहू तुकाराम पाटील यांच्या रोपवाटिका पायाचा भूमीपूजन समारंभ कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास  विभागीय कृषी सहसंचालक कोकण श्री.लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, उपविभागीय कृषी अधिकारी अलिबाग दत्तात्रय काळभोर,  तालुका कृषी अधिकारी,पेण अनिल रोकडे, मंडळ कृषी अधिकारी श्री.पाटील व कृषी सहाय्यक हनुमंत शेलार, सबाजी पोटे, विष्णू लांडगे, ग्रामपंचायत सदस्य अनिल डोखले, महेश ठोंबरे इतर शेतकरी उपस्थित होते.

००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज