जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी घेतली कोविशिल्ड लस जिल्हा परिषद यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या “कोविशिल्ड” लसीकरण मोहिमेस प्रारंभ
अलिबाग, जि.रायगड, दि.15 (जिमाका)
:- जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी नुकतीच येथील जिल्हा रूग्णालयातील विशेष
लसीकरण कक्षात “कोविशिल्ड” लस घेतली. अशा प्रकारे
जिल्हा परिषद यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या “कोविशिल्ड” लसीकरणास प्रारंभ
झाला.
यावेळी
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा
पशुधन विकास अधिकारी डॉ.ब्यंकट आर्ले, सहाय्यक जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.खुरकुटे
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ,प्रमोद गवई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ,गजानन गुंजकर,
वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू तांभाळे, डॉ.दिपाली राजपूत, डॉ.अमोल खरात, अधिसेविका जयश्री
मोरे, सहाय्यक अधीक्षक सिद्धार्थ चौरे, सार्वजनिक आरोग्य सेविका उषा वावरे, अधिपरिचारिका
नम्रता नागले व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment