राज्य परिवहन दि.15 ते दि. 25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविणार तिकीट तपासणी विशेष मोहीम
अलिबाग,जि.रायगड,दि.15 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य
मार्ग परिवहन महामंडळामार्फत विशेष मार्ग तपासणी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
सध्या करोना आटोक्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाची
प्रवासी वाहतूक पूर्व नियोजनानुसार सुरू करण्यात आलेली आहे. गर्दीचा फायदा घेऊन काही
प्रवासी रा.प.बस मधून फुकट प्रवास करताना आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे. अशा फुकट
प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे रा.प.महामंडळ उत्पन्नापासून वंचित राहत असून रा.प.महामंडळाला
आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी
व प्रवास तिकीट घेण्यास भाग पाडण्यासाठी तसेच प्रवाशांमध्ये प्रवास तिकीट घेण्याची
जागृती निर्माण करण्यासाठी विभागीय कार्यालय, पेण व रायगड विभागातील सर्व आगारांमार्फत
दिनांक 15 ते दि.25 फेब्रुवारी 2021 या कालावधीत
तिकीट तपासणी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामुळे फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना
अटकाव करून त्यांच्यात तिकीट काढण्याची प्रवृत्ती तयार हाेईल व रा.प.महामंडळाचे सार्थ उत्पन्न रा.प.महामंडळास मिळेल,
अशी अपेक्षा आहे.
तरी सर्व प्रवाशांनी रा.प. महामंडळास सहकार्य
करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, रायगड विभाग, पेण यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment