मत्स्य व्यवसायावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापित करण्यासाठी मौजे पांगळोली येथील जागा हस्तांतरित पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा महत्वपूर्ण निर्णय
अलिबाग,जि.रायगड,
दि.15 (जिमाका) :- महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई
यांच्या मागणीनुसार तसेच उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांनी केलेल्या शिफारशीनुसार
व अवर सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग,
मंत्रालय, मुंबई यांच्याकडील दि.6 ऑक्टोबर 2020 च्या पत्रान्वये रायगड जिल्हाधिकारी
यांना प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 22 व महाराष्ट्र
जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम 1971 मधील नियम-5 व 6 तसेच महाराष्ट्र
शासन अधिसूचना क्र.जमीन 2015/प्र.क्र.55/ज-1, दि.31 डिसेंबर 2015 (द्वितीय सुधारणा)
नियम 2015 मधील नियम 3 (ब) मधील तरतूदीनुसार श्रीवर्धन तालुक्यातील मौजे पांगळोली येथील
गट नं.104 मधील 11-40-0 हेक्टर जमीन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई
यांना मत्स्य व्यवसायावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था स्थापित करण्यासाठी
हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण
निर्णयामुळे जिल्ह्यात अद्ययावत अशी मत्स्य व्यवसायावर आधारित कौशल्य विकास प्रशिक्षण
संस्था सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
०००००
Comments
Post a Comment