गावाच्या विकासासाठी जिल्हाधिकारी यांनी बांधला संवादसेतू
रायगड जिमाका दि. 3:- राज्य शासनामार्फत ग्रामपातळीवर विविध योजना, उपक्रम राबविण्यात येतात. जिल्ह्याच्या विकासामध्ये ग्रामविकास आणि लोकसहभाग खुप महत्वाचा असतो. या विकासाबाबत गावकऱ्यांचे अभिप्राय, अपेक्षा, समस्या आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज संवाद सेतू बांधला. निमित्त होते संवाद सेतू उपक्रमाचे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होत असलेला विकास आणि गावकरी यांच्याशी हितगुज करण्यासाठी संवाद सेतू हा उपक्रम सुरु केला आहॆ. या उपक्रमंतर्गत आपटा आणि कर्नाळा ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक, आरोग्य सेविक, अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधला. या उपक्रमाच्या माध्यमातून गाव सक्षम करण्यावर आणि ग्राम विकासात लोकसहभाग वाढविणे तसेच समस्या तात्काळ सोडविण्यास प्राधान्य देणे हा मानस असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी नमूद केले. प्रत्येक आठवड्याला मंगळवार किंवा गुरुवार रोजी स. 10 वा हा संवाद सेतू कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले. आपटा ग्रामपंचायत उपसरपंच चव...