पशुधन विमा योजना अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :- 09 ऑगस्ट, 2016
वृत्त क्र.505
पशुधन विमा
योजना
अधिक
लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा
अलिबाग दि09 :- पशुधन विमा
योजनेमुळे जनावरांना विम्याचे संरक्षण मिळणार असल्याने ही योजना गोर गरीबांसाठी
उपयुक्त आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पशुधन मालकांना मिळावा म्हणून ही योजना
अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मस्त्य संवर्धन विभागाचे मंत्री महादेव
जानकर यांनी आज माथेरान येथे केले.
माथेरान येथे रायगड जिल्हा
परिषदेच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत आयोजित पशुधन विमा पंधरवडयाच्या कार्यक्रम ते
बोलत होते. यावेळी रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, माथेरानच्या
नगराध्यक्षा वंदना शिंदे, उपनगराध्यक्षा विनिता गुप्ता, प्रादेशिक सह आयुक्त
पी.एम.कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनिल खोडवे आदि मान्यवर उपस्थित
होते.
पुढे बोलताना मंत्री महोदय
म्हणाले की, राज्यात सर्वत्र 1 ते 15 ऑगस्ट, या कालावधीत पशुधन विमा पंधरवडा
कार्यक्रम राबविण्यात येत आहे. माथेरान येथे वाहनांना बंदी असल्याने येथे वाहन
म्हणून घोडयाचा उपयोग केला जातो. घोडा हा पर्यटकांसाठी वाहन म्हणून महत्वाचे साधन
आहे. त्यामुळे आज या पंधरवडयाचा निमित्ताने घोडयांचा विमा उतरविण्यात येत आहे.
याचा लाभ येथील गरीब घोडे मालकांना निश्चित होईल. पशुसंवर्धन विभाग व न्यू इंडिया
इन्शुरन्स कंपनी मार्फत ही योजना राबविण्यात येत असून माथेरान येथील 100 घोडयांचा
विमा उतरविण्यात आला.
तसेच कार्यक्रमाच्या आधी मंत्री महोदयांनी पशुसंवर्धन विभागाचा
सविस्तर आढावा घेतला. तसेच योजना राबविण्या संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी बाबत मार्गदर्शन केले. रायगड जिल्हयामध्ये पशुसंवर्धन
विभागाच्या सर्व योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागातील
अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी केली.
उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी रायगड जिल्हा परिषद मार्फत
राबविण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन विभागाची माहिती दिली व रायगड जिल्हा परिषद विविध
योजना राबविण्यात अग्रेसर असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात रायगड जिल्हा
परिषद पशुसंवर्धन विभागाच्या कार्याची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री महोदयांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमास माथेरान नगरसेवक मनोज खेडकर, राजेश दळवी,
शिवाजी शिंदे, दिनेश सुतार, नगरसेविका सुनिता आखाडे, उषा पांगसे, प्रतिभा घावरे, माथेरान पशुधन विकास अधिकारी धर्मराज रायबोले, तसेच
जिल्हयातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माथेरान येथील नागरीक उपस्थित
होते.
00000000
Comments
Post a Comment