अवयवदान श्रेष्ठ दान जनजागृती महा अभियान

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
    दिनांक    26 ऑगस्ट 2016                                                              लेख : 24                
अवयवदान श्रेष्ठ दान
जनजागृती महा अभियान
      
       अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण करुन विविध गंभीर आजारावर उपचार साध्य होत आहेत.  अवयवदानाअंतर्गत किडनी, लिवरचे प्रत्यारोपण करण्यात येते.  तसेच मस्तिष्क स्तंभ, मृत पश्चात किडनी,लिवर, फुफ्फूस ह्दय, त्वचा आदि अवयवदान करण्यात येतात.  अवयवदानाने एखाद्याला जीवनदान मिळू शकते.  राज्यात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक रुग्ण वेगवेगळी अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. 
    त्यामुळे  अवयवदानाचे महत्व लक्षात घेऊन समाजात जनजागृती होण्यासाठी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत महा अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे.  त्याबाबत माहिती देणारा लेख


        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयवदानाची गरज व महत्व जाणून याबाबत जनजागृती होण्यासाठी अभियान राबविण्याचे सूचित केले.  त्यानुसार राज्यात महा अवयवदान अभियान होत आहे.  या अभियानांतर्गत इच्छुक अवयवदात्यांना 15 ऑगस्ट 2016 पासून  ते 1 सप्टेंबर 2016 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील शहराच्या ठिकाणी किमान 3 हजार अवयव नोंदणी कार्यक्रम निमंत्रणे व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान 1 हजार  अवयव नोंदणी कार्यक्रम निमंत्रणे घरोघर जाऊन वाटण्यात येतील.
 मंगळवार दि. 30 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर शुभारंभ व अवयवदान जागृती महारॅलीचे आयोजन ,  बुधवार दि.31 ऑगस्ट 2016 रोजी जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर कार्यशाळा, चर्चासत्र, निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे.  तर गुरुवार दि. 1 सप्टेंबर 2016 रोजी अवयवदान अभियान नोंदणी शिबीराचे उद्घाटन कार्यक्रम व अवयवदान नोंदणी केलेल्या अवयवदात्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
अवयवदान
            जीवंतपणी लिवर व किडनी दान करता येते.  मस्तिष्क स्तंभ मृत पश्चात (barin death झाल्यावर) किडनी व लिवर, फुफ्फूस, ह्दय, स्वादुपिंड, त्वचा इत्यादी अवयवदान करण्यात येतात.  मस्तिष्क स्तंभ मृत म्हणजे ज्या व्यक्तींची चेतना व श्वासोच्छवास कायम बंद झाला आहे पण ह्दयक्रिया चालू आहे  याचा अर्थ असा कि barin death झाल्यावर त्यास डॉक्टराचे पथक प्रमाणित करते व अशा व्यक्तीने अवयव दानाचा फॉर्म भरला असेल तर नातेवाईक ZTCC (Zonal Transplantation Coordination Committee) ला कळवतात व किडनी, लिवर,स्वादुपिंड, ह्दय, फुफ्फूस, डोळा हे अवयव काढण्यात येतात व विहित पध्दतीने ते संबधित रुग्णालयाला पोचवले जातात.  रुग्णालये व रुग्णांची प्रतिक्षा यादी ZTCC (Zonal Transplantation Coordination Committee) मार्फत ठेवली जाते.  या पध्दतीने  एक मेंदू मृत (barin death ) झालेली व्यक्ती सहा व्यक्तींना जीवनदान देऊ शकते.  मृत्यूनंतर सहा तासाच्या आत डोळे व त्वचा दान करता येते.
विविध विभागांचे सहकार्य
            या अभियानात वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महसूल विभाग, गृह विभाग यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.  अवयवदानाबाबत प्रबोधन करुन जास्तीत जास्त दात्यांना संपर्क करुन समाजात याबाबत जागृती निर्माण करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना देण्यात आली आहे.   त्या अनुषंगाने महा अवयवदान जागृती अभियानामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे मार्गदर्शन केले जाणार असून राज्यभरातून जास्तीत जास्त अवयवदानाच्या नोंदणीचे उद्दिष्ट साध्य  करण्याचा प्रयत्न केला जाईल.  त्यासोबत समाजाच्या विविध स्तरामध्ये अवयवदानाचे महत्व रुजविण्याचे काम केले जाईल.  संपूर्ण राज्यभर राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये सुसूत्रता राहण्यासाठी संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन कार्यक्रमाचे नियोजन व सनियंत्रण करणार आहेत.   सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा  शल्य चिकित्सक, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावतीने विविध उपक्रम  राबविण्यात येणार आहेत.  यासाठी शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचा सहभाग आवश्यक असून एम.जी.एम.वैद्यकीय महाविद्यालय,  होमिओपाथिक मेडिकल कॉलेज अलिबाग, लक्ष्मी धर्मादाय संस्था, पत्रकार, स्वयंसेवी सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
जिल्हास्तर समिती
            हे अभियान राबविण्यासाठी जिल्हा स्तरावर मा.पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व मा.जिल्हाधिकारी यांच्या सहअध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यात जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा  पोलीस अधिक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, रोटरी व लायन्स क्लबचे अध्यक्ष, सर्व पत्रकार, इंडियन मेडिकल असोशिएशन यांचा समावेश आहे.  जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य सचिव आहेत तर तालुका स्तरावर सभापती पंचायत समिती हे अध्यक्ष असून त्यात स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस उप अधीक्षक, मुख्याधिकारी नगरपालिका,पत्रकार, डॉक्टर्स, समाज सेवक यांचा समावेश आहे तर तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क
            याबाबत अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.  झोनल ट्रान्सप्लांट कोओर्डीनेशन सेंटर, एल.टी.एम.जी. हॉस्पिटल, कॉलेज इमारत पहिला मजला, रुम नंबर 29 ए, स्कीन बँक जवळ, सायन पश्चिम मुंबई 400032 दूरध्वनी क्र.022-24028197 सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत शनिवार सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत www.ztccmumbai.org ई-मेल आयडी ztccinmumbai@hotmail.com नेत्रदानासाठी  इन्स्टिटयूट व रुग्णालयाच्या पथकामार्फत इच्छुक नेत्रदात्याच्या मृत्यू नंतर सहा तासाच्या आत डोळे घेतले जातात.
 लक्ष्मी आय इन्स्ट्यिूट 022-27453147/27452228 तसेच जिल्हा रुग्णालयात डॉ.प्रधान नेत्र शल्य चिकित्सक 09371218539,08308724200, डॉ.जाधव नेत्र शल्य चिकित्सक 09179767462, श्री. नेमन नेत्र चिकित्सा अधिकारी 08975263560 यांचेशी संपर्क साधावा.
0000
                                                                  डॉ.बी.एस.नागावकर
                                                                           जिल्हा शल्यचिकित्सक,
                                                                  रायगड-अलिबाग   

                                                                                       ( मार्फत जिल्हा माहिती कार्यालय)     

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक